स्मृती मंधानाने बॉयफ्रेंडसोबत पार्टीत केली धमाल
22 April 2024
Created By : Manasi Mande
भारतीय महिला संघाची फलंदाज स्मृती मंधाना बरीच चर्चेत असते. नुकतीच तिने तिचा बॉयफ्रेंड पलाश मु्च्छलसोबत पार्टी केली.
स्मृतीची ही पार्टी, तिचा बॉयफ्रेंड पलाश याची बहीण पलक मुच्छल आणि तिचा नवरा मिथुन यांच्या घरी झाली.
पलाशची बहीण पलक आणि स्मृती मंधाना या दोघी चांगल्या मैत्रिणी आहेत.
स्मृतीने पार्टीचा फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला. Happy Times असेही तिने त्यासोबत लिहीले.
पलाशच्या एका चित्रपटाच्या निमित्ताने ही पार्टी झाल्याचे दिसत आहे.
'काम चालू है' या चित्रपटाच्या प्रीमिअर दरम्यान पलाश सोबत स्मृती मंधाना दिसली होती. तिनेही त्याच्या चित्रपटाचे प्रमोशन केले.
पलाश आणि स्मृती गेल्या बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे.
6 वर्षांपूर्वी सोडली ॲक्टिंग, आता केवळ IPL मध्येच दिसते ही अभिनेत्री
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा