6 जानेवारी 2025

कागिसो रबाडाच्या नावावर लाजिरवाणा विक्रम!

कागिसो रबाडा हा जगप्रसिद्ध गोलंदाज आहे. पण कसोटी मालिकेत त्याने नकोसा विक्रम प्रस्थापित केला आहे. 

कागिसो रबाडाला वारंवार नो बॉल फेकण्याची सवय लागली आहे. त्याने 51 नो बॉल फेकले असं सांगितलं तर विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. 

मागच्या सहा कसोटी सामन्यात कागिसो रबाडाने 51 नो बॉल टाकले आहेत.

कागिसो रबाडा दक्षिण अफ्रिकेत खेळलेल्या 6 कसोटी आठहून अधिक सरासरीने नो बॉल टाकले.

कागिसो रबाडाने पाकिस्तानविरुद्धच्या केपटाऊन कसोटीत 17 नो बॉल टाकले. 

पाकिस्तानविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यात कागिसो रबाडाने एकूण 19 चेंडू नो टाकले. 

रबाडाने केपटाऊन कसोटीच्या दोन डावात 6 विकेट घेतल्या. दक्षिण अफ्रिकेने दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानला 10 विकेटने पराभूत केलं.