स्पेनने फुटबॉलनंतर क्रिकेटमध्ये रचला इतिहास, वर्ल्ड चॅम्पियनला धोबीपछाड

26  ऑगस्ट 2024

Created By: राकेश ठाकुर

स्पेन हा देश फुटबॉलसाठी प्रसिद्ध असून क्रिकेट खूपच कमी खेळलं जातं. पण स्पेनने क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी केली आहे.

स्पेनने युरोप टी20 वर्ल्ड कप सब रिजनल पात्रता सी मध्ये ग्रीसला 7 विकेटने पराभूत करत एक विक्रम रचला आहे. 

टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्पेनचा सलग 14वा विजय आहे. यासह आंतरराष्ट्रीय पातळीवर सलग सर्वाधिक सामने जिंकणारा संघ ठरला आहे. 

स्पेनपूर्वी हा रेकॉर्ड मलेशियाच्या नावावर होता. मलेशियाने सलग 13 सामन्यात विजय मिळवला होता.

स्पेनने 25 फेब्रुवारी 2023 पासून एकही टी20 सामना गमावलेला नाही. शेवटचा पराभव इटलीकडून झाला होता. 

टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात टीम इंडियाने सलग 12 सामने जिंकले आहेत. 

टीम इंडियाने हा कारनामा 2021 ते 2022 च्या दरम्यान केला होता.