संघ सहकाऱ्यांबाबत ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथचा धक्कादायक खुलासा
22 ऑक्टोबर 2024
Created By: राकेश ठाकुर
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत स्टीव्ह स्मिथ ओपनिंग करणार नाही. त्याने नुकताच हा निर्णय घेतला आहे.
डेविड वॉर्नरच्या निवृत्तीनंतर स्टीव्ह स्मिथने ओपनिंगचा निर्णय घेतला होता. पण कामगिरी हवी तशी झाली नाही.
स्टीव्ह स्मिथ आता जुन्या क्रमांकावरच फलंदाजी करणार आहे. म्हणजे चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरेल.
स्टीव्ह स्मिथ फलंदाजीचा क्रम बदलण्याबाबत एक मोठं कारण सांगितलं आहे. त्यामुळे प्रत्येक जण आश्चर्यचकीत आहे.
स्टीव्ह स्मिथने सांगितलं की, ओपनिंग करत असल्याने संघातील दोन खेळाडू नाराज होते. हे दोन खेळाडू म्हणजे उस्मान ख्वाजा आणि मार्नस लाबुशेन
स्मिथने सांगितलं की, प्रामाणिकपणे सांगायचं तर उस्मान आणि मार्नस मी ओपनिंग करायचो म्हणून जळायचे.
'त्यांचं म्हणणं होतं की, मी त्यांच्यानंतर फलंदाजी करावी. मग हे जाही आहे की माझा चौथ्या क्रमांकावर चांगला रेकॉर्ड आहे.', असं स्टीव्ह स्मिथ म्हणाला.