मोहम्मद शमीचं बीसीसीआय आणि क्रिकेट चाहत्यांना वचन

27  ऑक्टोबर 2024

Created By: संजय पाटील

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी 2024 या वर्षात अद्याप एकही सामना खेळू शकलेला नाही

वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेतील चमकदार कामगिरीनंतर मोहम्मद शमी दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर

टीम इंडियाला शमीच्या पुनरागमनाची प्रतिक्षा आहे. तर शमी दुखापतीतून बरा होण्यासाठी प्रयत्न करतोय मात्र त्यात अनेक अडचणी येत आहेत

मोहम्मद शमीचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी समावेश नाही, त्यामुळे शमी फिट नसल्याचं स्पष्ट झालं आहे

शमीने तो अद्याप फिट न होऊ शकल्याने क्रिकेट चाहत्यांची आणि बीससीसीआयची माफी मागितली आहे

शमीने वर्कआऊट करताना एक व्हीडिओ पोस्ट केलाय. शमीने व्हीडिओ कॅप्शनमधून क्षमा मागत लवकरच कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी फिट होणार, असा शब्द त्याने दिलाय

शमीच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जसप्रीत बुमराह आणि इतर गोलंदाजांवर अधिकची जबाबदारी असणार, हे निश्चित आहे.