सूर्यकमार यादव कुणासाठी प्रेम व्यक्त करता करता भावूक झाला?

 1 डिसेंबर 2024

टीम इंडियाचा टी 20I कर्णधार सूर्यकुमार यादवने आतापर्यंत झंझावाती बॅटिंग करत प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना घाम फोडला आहे.

सूर्यकुमार ऑन फिल्ड फार एक्टीव्ह असतो, तसेच तो किती भावूक आहे हे त्याच्या मैदानातील वागणुकीवरुन स्पष्ट होतं.  सहकाऱ्यासंह मोठ्या भावाप्रमाणे वागतो 

मात्र सूर्यासोबत असं काही झालं ज्यामुळे तो भावूक झाला  

सूर्याच्या बहिणीने नव्या प्रवासाला सुरुवात केलीय, सूर्याच्या  बहिणीचं लग्न झालं

सूर्याने बहिणीच्या लग्नाच्या फोटोसह एक खास मेसेज पोस्ट केलाय, क्रिकेटरने या मेसेजमध्ये बहिणीचं लग्न भावूक क्षणापैकी एक असल्याचं म्हटलंय

सूर्याने त्याच्या बहिणीच्या लग्नाचे विविध फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या  

दरम्यान सूर्या आता बहिणीच्या लग्नानंतर मुंबई टीमसह जोडला जाणार आहे, सूर्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसणार आहे