आयपीएल मेगा ऑक्शनबाबत मोठा खुलासा, जाणून कधी आणि कधी होणार ते?

19  सप्टेंबर 2024

Created By: राकेश ठाकुर

आयपीएल 2025 स्पर्धेसाठी फ्रेंचायझींनी कंबर कसली आहे. मेंटॉरपदी दिग्गज खेळाडूंची वर्णी लागली आहे.

मागच्या दहा वर्षात तीन वेळा मेगा ऑक्शन झालं आहे. आता पुन्हा एकदा मेगा ऑक्शन होणार आहे. 

रिपोर्टनुसार, बीसीसीआय येत्या काही दिवसात रिटेंशन पॉलिसी जाहीर करेल. 

रिटेनशन पॉलिसीनंतर किती प्लेयर ठेवायचे आणि सोडायचे ते ठरेल. राईट टू मॅच कार्ड असेल की नाही याबाबतही कळेल.

यापूर्वी सर्व फ्रेंचायझींना 4-4 खेळाडू रिटेन करण्याची संधी होती. यावेळी यात वाढ होऊ शकते. 

आयएएनएसच्या बातमीनुसार, आयपीएल मेगा ऑक्शन नोव्हेंबरच्या शेवटच्या किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होईल. 

आयपीएल 2024 मध्ये ऑक्शनचं आयोजन दुबईत केलं होतं. यावेळीही विदेशात होण्याची शक्यता आहे.