गंभीरच्या प्रशिक्षणाखाली टीम इंडियावर ओढावली सर्वात वाईट स्थिती

20  ऑक्टोबर 2024

Created By: राकेश ठाकुर

टी20 वर्ल्डकपनंतर टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची धुरा गौतम गंभीरच्या खांद्यावर आली. त्यानंतर टीम इंडियाची कामगिरी काही खास राहिली नाही. 

गौतम गंभीरच्या नेतृत्वात टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर गेली होती. टीम इंडिया 27 वर्षानंतर वनडे मालिका हरली होती.

वनडे मालिकेत तिन्ही सामन्यात टीम इंडियात ऑलआऊट झाली होती. भारतीय क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच असं झालं होतं. 

45 वर्षात पहिल्यांदाच असं घडलं की एका वर्षात टीम इंडिया एकही वनडे सामना जिंकली नाही. यावर्षी तीन वनडे सामन्यात दोन गमावले. एक सामना ड्रॉ झाला. 

टीम इंडियाने 36 वर्षानंतर न्यूझीलंडविरुद्ध देशात कसोटी सामना गमावला आहे. यापूर्वी न्यूझीलंड 1988 मध्ये कसोटी सामना जिंकला होता. 

टीम इंडियाने 19 वर्षानंतर बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये कसोटी सामना गमावला. यापूर्वी 2005 मध्ये पाकिस्तानने पराभूत केलं होतं. 

12 वर्षानंतर भारताने पहिल्यांदाच एका वर्षात देशात खेळताना दोन कसोटी सामने गमावले. न्यूझीलंड आणि इंग्लंडने यावर्षी भारताला पराभूत केलंय. 

न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघ 46 धावांवर ऑलआऊट झाला. इतिहासात पहिल्यांदाच टीम इंडिया देशात 50 पेक्षा कमी धावांवर ऑलआऊट झाली.