वनडे वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये 'या' खेळाडूंनी सेंच्युरी केली

07 November 2023

Created By : Chetan Patil

इंग्लंडच्या ग्राहम गूच याने 1987 च्या वनडे वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये भारताविरोधात शतक केलं होतं. त्यावेळी त्याने 115 धावा केल्या होत्या.

पाकिस्तानच्या सईद अनवरने 1987 च्या वनडे वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये न्यूजीलंड विरुद्धच्या सामन्यात शतक केलं होतं.

सईदने त्यावेळी 113 धावा केल्या होत्या.

भारतीय फलंदाज सौरव गांगुलीने 2003 च्या वनडे वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये केनियाच्या विरोधात शतक ठोकलं होतं.

सौरव गांगुलीने त्यावेळी 111 धावा केल्या होत्या.

श्रीलंकेचा फलंदाज महिला जयवर्धन याने 2007 च्या वनडे वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये न्यूजीलंडच्या विरोधात शतक केलं होतं.

जयवर्धनने त्यावेळी 115 धावा केल्या होत्या.