29 नोव्हेबर 2024

डे-नाईट कसोटीत सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज, टॉप 5 मधील तीन खेळाडू 'आऊट'

Created By: राकेश ठाकुर

बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील दुसरा सामना एडिलेडच्या ओव्हलमध्ये खेळला जाणार आहे. हा सामना डे नाईट असून 6 डिसेंबरला होणार आहे.

टीम इंडिया पाचव्यांदा पिंक बॉल कसोटी सामना खेळणार आहे. पाच कसोटी सामन्यात कोणते फलंदाज यशस्वी ठरलेत जाणून घेऊयात.

विराट कोहलीच्या नावावर पिंक बॉल कसोटीत सर्वाधिक धावा आहेत. 4 कसोटीत त्याने 277 धावा केल्या आहेत. तसेच शतक ठोकणारा एकमेव फलंदाज आहे. 

विराट कोहलीनंतर रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने तीन कसोटी सामन्यात 173 धावा केल्या आहेत. 

तिसऱ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर आहे. त्याने एक पिंक बॉल कसोटी खेळली असून 159 धावा केल्या आहेत. पण या मालिकेत खेळत नाही. 

या यादीत अजिंक्य रहाणे चौथ्या स्थानावर आहे. त्याने 3 पिंक कसोटी सामने खेळले असून त्याने 100 धावा केल्या आहेत. तोही या मालिकेत नाही. 

चेतेश्वर पुजाराचा या यादीत पाचवा क्रमांक लागतो. त्याने तीन कसोटीत 98 धावा केल्या आहेत. पण ऑस्ट्रेलिया मालिकेत नाही.