20 मार्च 2025
आयपीएलमध्ये दोन नवे कर्णधार, पहिल्यांदाच करणार नेतृत्व
आयपीएल 2025 स्पर्धा 2022 पासून सुरु होणार आहे. ही स्पर्धा काही खेळाडूंसाठी खास असणार आहे.
या पर्वात अनेक संघांनी आपले कर्णधार बदलले आहेत. यात श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, अजिंक्य राहणे यांची नावं आहेत.
दोन कर्णधार असे आहेत की ते पहिल्यांदाच कर्णधारपद भूषवणार आहेत. आयपीएलमध्ये पहिल्यांदाच ही जबाबदारी पार पाडणार आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने कर्णधारपद सोपवलेल्या रजत पाटिदारचं नाव या यादीत पहिल्या स्थानावर येतं.
रजत पाटिदार संपूर्ण पर्वात संघाचं नेतृत्व करणार आहे. फाफ डु प्लेसिसला रिलीज केल्यानंतर त्याच्याकडे ही जबाबदारी सोपवली आहे.
राजस्थान रॉयल्सने अष्टपैलू रियान परागकडे कर्णधारपद सोपवलं आहे. रियान पराग पहिल्यांदाच ही जबाबदारी पार पाडणार आहे.
संजू सॅमसन दुखापतग्रस्त असल्याने रियान पराग सुरुवातीच्या तीन सामन्यात ही जबाबदारी पार पाडणार आहे.