यूरिक अ‍ॅसिडमुळे विराट कोहलीची लाईफस्टाईल बदलली!

20  सप्टेंबर 2024

Created By: राकेश ठाकुर

टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली फिटनेससाठी ओळखला जातो. 

विराट कोहली फक्त जिममध्ये घाम गाळत नाही तर खाण्यापिण्यावरही त्याचं बारीक लक्ष असतं.

विराट कोहलीचा डाएट प्लान सर्वांनाच माहिती आहे. पण यात यूरिक अ‍ॅसिडची महत्त्वाची भूमिका आहे.

सामान्य व्यक्तींना त्रासदायक ठरणारा यूरिक अॅसिड प्रकार विराटसारख्या फिट खेळाडूलाही आहे. त्यामुळेच लाईफस्टाईल बदलली. 

विराट कोहलीने सांगितलं की, 2018 मध्ये एका सामन्यादरम्यान अंग दुखू लागलं. जेव्हा टेस्ट केली तेव्हा कळलं की युरिक अ‍ॅसिड वाढलं आहे. 

विराट कोहलीने इंग्लंड दौऱ्यानंतर मटण खाणं सोडलं. त्यानंतर त्याला बरं वाटू लागलं. तसेच कामगिरीवरही सकारात्मक परिणाम झाला. 

विराट कोहलीने यानंतर स्वत:ला शाकाहारी केलं. हा जीवनातील सर्वात चांगला निर्णय असल्याचं सांगितलं.