टीम इंडियात तीन वर्षानंतर पुनरागमन आणि पहिल्याच सामन्यात 3 विकेट
6 ऑक्टोबर 2024
Created By: राकेश ठाकुर
भारत आणि बांग्लादेश यांच्यात टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला.
हा सामना फिरकीपटू वरुण चक्रवर्तीसाठी खास राहिला आहे. वरुण चक्रवर्तीने 3 वर्षानंतर पुनरागमन केलं.
वरुण चक्रवर्तीने यापूर्वी टीम इंडियासाठी शेवटचा सामना 2021 टी20 वर्ल्डकपमध्ये स्कॉटलंडविरुद्ध सामना खेळला होता. तेव्हापासून संघातून बाहेर होता.
वरुण चक्रवर्तीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जबरदस्त पुनरागमन केला. वरुण चक्रवर्तीने 4 षटकात 31 धावा देत 3 गडी बाद केले.
वरुण चक्रवर्तीने पहिल्या षटकात 15 धावा दिल्या. तसेच उर्वरित तीन षटकात फक्त 16 धावा देत 3 गडी बाद केले.
गौतम गंभीर 2024 आयपीएलमध्ये केकेआरचा मेंटॉर असताना वरुण चक्रवर्ती संघात होता. त्यामुळे त्याचं कमबॅक विशेष आहे.
आयपीएलमध्ये वरुण चक्रवर्तीने केकेआरला चॅम्पियन बनवण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्याने 15 सामन्यात 21 गडी बाद केले होते.