6 जानेवारी 2025
विनोद कांबळीने दुसरं लग्न करण्यासाठी दिलं होतं खोटं आश्वासन!
विनोद कांबळी गेल्या दिवसांपासून तब्येतीच्या कारणामुळे चर्चेत आले. नुकतंच त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
विनोद कांबळीने दोन लग्न केली आहे. 1998 मध्ये त्याने नोएल लुईसशी लग्न केलं. पण हे लग्न फार काळ टिकलं नाही.
विनोद कांबळीने 2006 मध्ये अँड्रिया हेविटसोबत दुसरं लग्न केलं. अँड्रिया हेविट एक यशस्वी मॉडेल होती.
अँड्रिया हेविटने एका मुलाखतीत सांगितलं की, कांबळी लग्न करण्यापूर्वी तिने एक अट ठेवली होती.
अँड्रिया हेविटने दैनिक भास्करशी बोलताना सांगितलं की, दारूचं व्यसन सोडेल या अटीवर लग्न केलं होतं.
अँड्रिया हेविटने सांगितलं की, 'लग्न करण्यापूर्वीच मी सांगितलं होतं की दारू सोडावी लागेल.' त्याने दारूही सोडली पण नंतर त्याने हे आश्वासन मोडलं.
अँड्रिया हेविटने सांगितलं की, विनोद कांबळीने सहा वर्षे दारूला हात लावला नव्हता. पण सिगारेट पित होता.