17  डिसेंबर 2024

विनोद कांबळीने दारुचे 10 पेग मारले तरी ठोकलं शतक, स्वत:च केला खुलासा

विनोद कांबळी क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. त्याची तब्येत आणि आर्थिक स्थिती पाहून सध्या चर्चेत आहे. 

विनोद कांबळीने क्रिकेटचा एक काळ गाजवला. पण त्यानंतर त्याच्या कारकि‍र्दीला उतरती कळा लागली. दारुच्या आहारी गेल्याने वाटोळं झालं.

विनोद कांबळी आता दारू सोडण्यास तयार आहे. पण एक दिवस असा होता की 10 पेग दारू पिऊन शतक ठोकलं होतं.

विनोद कांबळीने मिड डेला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा करत सांगितलं होतं की, रात्री 10 पेग दारून पिऊन सकाळी रणजी ट्रॉफी सामन्यात शतक ठोकलं होतं. 

विनोद कांबळीने सांगितलं होतं की, 'आमचे कोच बलविंदर सिंह संधू टेन्शनमध्ये होते की मी वेळेआधी उठेन की नाही. पण मी उठलो आणि शतक ठोकलं.'

विनोद कांबळी सध्या आर्थिक अडचणीत आहे. बीसीसीआयकडून मिळणाऱ्या 30 हजार रुपयांच्या पेन्शनवर मुंबईत आपलं घर चालवत आहे.

विनोद कांबळी टीम इंडियासाठी एकूण 17 कसोटी आणि 104 वनडे सामने खेळला आहे. यात त्याने 3561 धावा केल्या आहेत.