राहुल द्रविडमुळे विनोद कांबळीची पेन्शन निम्मी घटली, कसे काय?

12 December 2024

Created By: Atul Kamble

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी अलिकडील एका व्हिडीओमुळे अचानक चर्चेत आला आहे

 विनोद कांबळीची हालाखीची स्थिती या व्हिडीओमुळे जगासमोर आलीय

काही वर्षांपूर्वी बीसीसीआयच्या पेन्शनवर आपण जगत असल्याचे कांबळीने सांगितले होते

डावखुरा फलंदाज कांबळीला आधी १५ हजार पेन्शन होती. २०२२च्या BCCI च्या नव्या नियमाने ती आता ३० हजार झालीय

ही पेन्शन दुप्पट झाली असती पण माजी कप्तान राहुल द्रविड याच्यामुळे झाली नाही

 द्रविडच्या प्रवेशाने टीम इंडियात कांबळीला संधी मिळाली नाही. तो केवळ १७ कसोटी सामने खेळू शकला

कांबळी जर २५ कसोटी सामने खेळला असता तर नव्या नियमानुसार त्याला ७० हजार महिन्याला मिळाले असते