धोनीला बाद करणाऱ्या संदीप शर्मासोबत अन्याय! झालं असं की...

8 एप्रिल 2025

Created By:  राकेश ठाकुर

आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्या सामना पार पडला. संदीप शर्माने जबरदस्त गोलंदाजी केली.

संदीप शर्माने शेवटच्या षटकात धोनीची विकेट घेऊन चेन्नई सुपर किंग्सकडून विजय हिसकावून घेतला.

संदीपने धोनीला बाद केल्यानंतर स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या फॅन रागावली. तिची बोलकी प्रतिक्रिया कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर व्हायरल झाली. 

फॅन गर्ल व्हायरल झाल्यानंतर इन्स्टाग्राम तिच्या फॉलोअर्सची संख्या झपाट्याने वाढली. फॅन फॉलोअर्स संख्या 800 वरून 4 लाखांपर्यंत पोहोचली. 

दुसरीकडे, संदीप शर्माच्या फॅन फॉलोअर्समध्ये काहीच फार मोठा बदल झाला नाही. त्याचे फॉलोअर्स 1.69 लाख आहेत. 

व्हायरल झाल्यानंतर सदर फॅनला स्विगी, येस मॅडमसारख्या ब्रँडने संपर्क साधला. पण संदीप शर्माला काहीच मिळालं नाही. 

धोनीच्या फॅन्सचं नाव आर्यप्रिया भुयान आहे. ती 19 वर्षांची असून गुवाहाटीची आहे.