मागच्या दोन कसोटी मालिकेत फेल गेल्यानंतर विराट कोहली आता ऑस्ट्रेलिया दौऱ्याची तयारी करत आहे.
विराट कोहलीने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्याने आपल्या नव्या टीमची घोषणा केली आहे. या टीमसोबत आता काम करणार आहे.
विराट कोहलीने नव्या मॅनेजमेंट कंपनीचा घोषणा केली आहे. कोहलीने सांगितलं की, बऱ्याच काळापासून स्पोर्टिंग बियॉन्डसोबत काम करत आहे. आता हीच कंपनी आता पुढचं व्यावसायिक बाबी सांभाळेल.
विराट कोहलीने सांगितलं की, 'मी माझी नवी टीम स्पोर्टिंग बियॉन्डसोबत नवी सुरुवात करण्यास उत्साहीत आहे. मागच्या काही काळापासून आम्मही एकत्र काम करत आहोत.'
विराटने मागच्या महिन्यात कॉर्नरस्टोन नावाच्या प्रतिष्ठीत सेलिब्रिटी मॅनेजमेंट कंपनीसोबतचं नातं संपवलं होतं.
टीम इंडिया 22 नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेत विराटकडून अपेक्षा आहेत.
विराट कोहलीला अजूनही सूर गवसलेला नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात फेल गेला तर कसोटी संघात कमबॅक होणं कठीण होईल.