सोनू निगमबाबत वीरेंद्र सेहवागचा मोठा खुलासा, म्हणाला

24  ऑक्टोबर 2024

Created By: राकेश ठाकुर

क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग इंडियन आयडल शोच्या 9व्या पर्वात विशेष अतिथी म्हणून सहभागी झाला होता. त्याचा त्याने एका पॉडकास्टमध्ये खुलासा केला.

वीरेंद्र सेहवागने यावेळी गायक सोनू निगमच्या अनोख्या शैलीवर प्रकाश टाकला

इंडियन आयडलमध्ये मी सोनू निगमकडून रियाजसाठी काही टिप्स मागितल्या होत्या. 

कधी कधी लोकं गाणं गाण्यास सांगतात, तेव्हा रियाज कसा करायचा ते सांग, असं वीरेंद्र सेहवागने सांगितलं.

सोनू निगमने सांगितलं की, मी कायम सराव करत असतो, मी आताही सराव करत आहे. पण तु्म्हाला ऐकू येत नाही. 

जेव्हा एखादा स्पर्धेत परफॉर्म करत असतो तेव्हा मी माझ्या मनात त्याचा सूर जुळवत असतो, असं सोनू निगमने सांगितलं. 

इतकंच काय तर बोलताना सुद्धा मनात रियाज करत असतो असं त्याने सांगितलं. त्यामुळे मी आश्चर्यचकीत झालो.