हार्दिकच्या आयुष्यात काय सुरु आहे? अनंतच्या लग्नात झालं असं की...

12 July 2024

Created By: Rakesh Thakur

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या अनंत-राधिका मर्चंटच्या लग्नात पोहोचला

मुंबईच्या जिओ सेंटरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह पार पडला. जगभरातील सेलिब्रेटिंनी यावेळी हजेरी लावली. 

अनंत-राधिकाच्या लग्नात दिग्गज खेळाडूंनीही हजेरी लावली. यात महेंद्रसिंह धोनीही सहभागी होता

अनंत अंबानीच्या लग्नात हार्दिक पांड्याही पोहोचला. मोठा भाऊ कृणाल आणि वहिनी पंखुडीही आली होती. 

हार्दिक पांड्यासोबत त्याची पत्नी नताशा स्टॅन्कोविक मात्र दिसली नाही. पांड्या भाऊ-वहिणी आणि इशान किशनसोबत लग्नात आला. 

यापूर्वी हार्दिकसोबत प्रत्येक कार्यक्रमात नताशा यायची. आयपीएलपासूनच ते एकत्र दिसले नाहीत. 

रिपोर्टनुसार हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्यात बिनसल्याचं सांगण्यात येत आहे. पण याबाबत अधिकृत माहिती नाही.