31 डिसेंबर 2024
कसोटी क्रिकेटमध्ये पांढरे कपडे परिधान करण्याचं कारण काय?
तुम्ही कधी विचार केला आहे का? कसोटी क्रिकेटमध्ये पांढरे कपडेच का परिधान करतात?
पांढरे कपडे परिधान करण्यामागे बरीच कारणं आहेत. ही जुनी परंपरा आहे, खेळाडूंच्या दृष्टीने लाभदायक आहे.
कसोटीत लाल चेंडू वापरला जातो आणि पांढऱ्या जर्सीमुळे हा चेंडू व्यवस्थितरित्या दिसतो.
कसोटी सामना दिवसा खेळला जातो. अशा स्थितीत प्रखर उन्हात खेळताना खेळाडूंना आरामदायी वाटतो.
पांढऱ्या जर्सीमुळे ताण कमी होतो. त्यामुळे दीर्घकाळ मैदानावर तग धरू शकतो.
पांढऱ्या जर्सीमुळे कसोटी क्रिकेटची एक वेगळी ओळख आहे. त्याला ऐतिहासिक कारण देखील आहे.
जगातील कसोटी खेळणारे सर्व देश पांढऱ्या रंगाच्या जर्सीसह मैदानात उतरतात.