लग्न, करिअर, कर्णधारपद..! हार्दिक पांड्या काय करणार घोषणा?
25 ऑक्टोबर 2024
Created By: राकेश ठाकुर
हार्दिक पांड्या काहीतरी मोठी घोषणा करण्याच्या तयारीत आहे. पण कोणत्या गोष्टीबाबत हे मात्र गुलदस्त्यात आहे.
लग्न, करिअर, कर्णधारपद की आणखी काय? हार्दिक पांड्याच्या घोषणेकडे चाहत्यांचं लक्ष लागून आहे.
हार्दिक पांड्याने इंस्टास्टोरीच्या माध्यमातून ही मोठी घोषणा करणार असल्याचं जाहीर केलं आहे.
हार्दिक पांड्याने घोषणा नेमकी कधी करणार हे काही सांगितलेलं नाही. फक्त लवकरच सांगणार अशी पोस्ट केली आहे.
हार्दिक पांड्या टीम इंडियापासून लांब असून फलंदाजीचा सराव करत आहे.
हार्दिक पांड्याने बांगलादेशविरुद्ध शेवटचा टी20 सामना खेळला होता.
हार्दिक पांड्या आता दक्षिण अफ्रिकेविरुद्ध टी20 मालिकेत खेळताना दिसू शकतो.