आयपीएलच्या पॉवरप्लेमध्ये सर्वात कमी षटकार मारणारा संघ कोणता? जाणून घ्या
25 एप्रिल 2025
Created By: राकेश ठाकुर
आयपीएल स्पर्धा म्हंटलं की गोलंदाजांची खैर नसते. पॉवरप्लेमध्ये तर षटकारांचा पाऊस पडतो. पण दोन संघांची स्थिती वाईट आहे.चला जाणून घेऊयात दहा संघांची स्थिती
आयपीएल 2025 स्पर्धेत पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक 37 षटकार राजस्थान रॉयल्सने मारले आहेत.
दुसऱ्या क्रमांकावर केकेआर असून 29 षटकार, तर मुंबई इंडियन्स तिसऱ्या क्रमांकावर असून 26 षटकार मारलेत.
पॉवरप्लेमध्ये सर्वात कमी षटकार मारण्याचा यादीत चेन्नई सुपर किंग्स आघाडीवर आहे. फक्त 5 षटकार मारलेत.
सनरायझर्स हैदराबादची स्थितीही अशीच आहे. त्यांनी पॉवर प्लेमध्ये 12 षटकार मारलेत.
हैदराबादमध्ये अभिषेक शर्मा, इशान किशन आणि हेड असूनही संघाची स्थिती नाजूक आहे.
हैदराबादने या तीन खेळाडूंसाठी 39.25 कोटी रुपये मोजले आहेत. पण पॉवरप्लेमध्ये हे खेळाडू फेल गेलेत.
रोज सकाळी रिकाम्या पोटी शेवग्याच्या शेंगा खाल्ल्या तर काय होईल?