3 डिसेंबर 2024
डे नाईट कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज कोण? जाणून घ्या
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात डे नाईट कसोटी सामना 6 डिसेंबरपासून एडिलेटमध्ये होणार आहे.
ऑस्ट्रेलियाचा डे-नाईट कसोटीत जबरदस्त रेकॉर्ड आहे. त्यांनी 12 पैकी 11 कसोटीत विजय मिळवला आहे. तर एका सामन्यात पराभव झाला आहे.
भारताने 4 डे नाईट सामने खेळले आहेत. त्यापैकी तीन सामन्यात विजय मिळवला आहे. एकमेव पराभव ऑस्ट्रेलियाकडून एडिलेडवरच झाला आहे.
डे नाईट कसोटीत सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम मिचेल स्टार्कच्या नावावर आहे. त्याने पिंक बॉलने 18.17 च्या सरासरीने 66 विकेट घेतल्यात.
दुसऱ्या क्रमांकावर नाथन लायन असून त्याने 43 विकेट, तर कमिन्सने 37 विकेट घेतल्या आहेत.
भारताकडून डे नाईट कसोटीत सर्वाधिक विकेट घेण्याचा मान आर अश्विनला मिळाला आहे. त्याने 18 विकेट घेतल्या आहेत.
बुमराह एडिलेडमध्ये अश्विनला मागे टाकू शकतो. त्याच्या नावावर 10 विकेट आहेत. पण अश्विनला दुसऱ्या कसोटीत संधी मिळाली तर मग कठीण आहे.