शिखर धवनची झोप नेमकी कशामुळे उडाली? लोकांकडे मागितली मदत
25 ऑक्टोबर 2024
Created By: राकेश ठाकुर
टीम इंडियाचा माजी ओपनर शिखर धवन त्याच्या बिंधास्त अंदाजासाठी ओळखला जातो. कायम हसत खेळत असतो.
टीम इंडियासोबत खेळतानाही त्याचा अंदाज असाच होता. त्यात आताही काहीच बदल झालेला नाही.
वैयक्तिक आयुष्यात संकटांचा सामना करूनही शिखर धवनच्या चेहऱ्यावरील हसू कायम असतं.
शिखर धवनला आता काही गोष्टींचा त्रास होत आहे. त्यामुळे झोपही नीट लागत नाही.
धवनने 24 ऑक्टोबरला रात्री 10.30 वाजता एक पोस्ट करत लिहिलं की, झोप लागत नाही. मदत हवी आहे.
धवनच्या या पोस्टमागे काही त्रास की ब्राँड मार्केटिंग आहे मात्र अस्पष्ट आहे. पण चाहत्यांची प्रतिक्रिया देत बुस्टर देण्याचा प्रयत्न केला.
धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तसेच आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटपासूनही दूर गेला आहे.