स्मृती मंधाना का कापत होती तिच्या बॅटचं हँडल?

4 ऑक्टोबर 2024

Created By: राकेश ठाकुर

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धा सुरु झाली आहे. या स्पर्धेत टीम इंडिया जेतेपदासाठी मेहनत घेत आहे. 

सांघिक कामगिरीवरच टीम इंडियाचं जेतेपदाचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. खासकरून सलामीची फलंदाज स्मृती मंधानाच्या कामगिरीवर लक्ष असेल.

स्मृती मंधाना सध्या चांगलीच फॉर्मात आहे. तिच्या कामगिरीत बॅटचं महत्त्वाचं योगदान आहे. 

स्मृती मंधाना एसजी कंपनीची बॅट वापरते आणि ती ब्रँड अम्बेसेडरही आहे. तिच्या बॅटचं वजन 1 किलो 240 ग्रॅम आहे.

स्मृती मंधाना यापूर्वी बॅटचं हँडल कापायची. या मागचं कारणंही आश्चर्यकारक आहे.

स्मती मंधानाने मुलाखतीत सांगितलं होतं की, काही वर्षांपूर्वी शॉर्ट हँडल असलेल्या बॅट आवडायच्या. पण झुलन गोस्वामीमुळे लांब हँडलच्या बॅट वापरू लागली.

स्मृती मंधाना माजी गोलंदाज झूलनकडून लांब हँडलची बॅट घ्यायची आणि गरजेनुसार हँडल थोडं कापायची. पण नंतर तिने असं करणं टाळलं.