125 कोटी रुपयांच्या बक्षिसातून हे चार खेळाडू राहणार वंचित?

3 July 2024

Created By: Rakesh Thakur

टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धा जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंवर पैशांचा वर्षाव होणार आहे. 

जेतेपद मिळवल्यानंतर बीसीसीआयने खेळाडूंना 125 कोटी रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. या व्यतिरिक्त 24 कोटी आयसीसीकडून मिळाले आहेत. 

टीम इंडियाची गुरुवारी ओपन बसमधून नरीमन पॉइंट ते वानखेडे अशी विजयी रॅली निघणार आहे. स्टेडियममधील कार्यक्रमात 125 कोटींचा धनादेश दिला जाईल. 

बीसीसीआयने दिलेले हे पैसे टी20 वर्ल्डकप जिंकवणाऱ्या खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या 18 जणांमध्ये वाटली जाईल. 

टी20 वर्ल्डकपसाठी असलेल्या चार खेळाडूंना बीसीसीआय बक्षिसाची रक्कम देणार का? असा प्रश्न आहे. 

टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेसाठी शुबमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद आणि आवेश खान हे राखीव खेळाडू होते. हे स्पर्धेसाठी तिथे गेले होते. 

राखीव खेळाडूंना पैसे मिळणार की नाही हे सर्वस्वी बीसीसीआयव अवलंबून आहे. बीसीसीआय नक्कीच या खेळाडूंचा विचार करेल यात शंका नाही.