बीसीसीआयकडून स्मृती मंधानाला वार्षिक करारानुसार 50 लाख रुपये मिळणार
24 मार्च 2025
बीसीसीआयकडून वूमन्स इंडिया टीमच्या वार्षिक कराराची घोषणा, एकूण 16 खेळाडूंचा समावेश
बीसीसीआयने एकूण 16 खेळाडूंना 3 श्रेणीत विभागलंय, स्मृतीचाही समावेश
स्मृतीसह दीप्ती शर्माचा ए ग्रेडमध्ये समावेश, स्मृतीकडे याआधीही ए ग्रेड सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट होता
स्मृतीला वार्षिक करारानुसार 1 ऑक्टोबर 2024 ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीसाठी 50 लाख रुपये मिळणार
स्मृतीला या व्यतिरिक्त एका कसोटीसाठी 15,वनडेसाठी 6 आणि टी 20i साठी 3 लाख रुपये मिळणार
स्मृतीने आतापर्यंत टीम इंडियाचं 7 कसोटी, 97 वनडे आणि 148 टी 20i सामन्यांत प्रतिनिधित्व केलंय
स्मृतीने कसोटीत 629, वनडेत 4209 आणि टी 20 मध्ये 3761 धावा केल्या आहेत