7 जानेवारी 2025
गेल्या एक महिन्यापासून युझवेंद्र चहलचा काहीच थांगपत्ता नाही?
टीम इंडियाचा फिरकीपटू युझवेंद्र चहलच्या आयुष्यात बरीच उलथापालथ सुरु आहे. धनश्रीसोबत काही बिनसल्याच्या बातम्या येत आहेत.
धनश्री आणि चहलने एकमेकांना इंस्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे. त्यामुळे या दोघांत बरंच काही घडल्याची चर्चा आहे.
युझवेंद्र चहल आणि धनश्री हे जोडपं 2022 मध्ये खूप चर्चेत आलं होतं. तेव्हा धनश्रीने चहल हे आडनाव काढलं होतं.
वैयक्तिक आयुष्याचा प्रभाव युझवेंद्र चहलच्या क्रिकेट करिअर पडला आहे. मागच्या एक महिन्यापासून क्रिकेटपासून दूर आहे.
युझवेंद्र चहलने 2023 नंतर टीम इंडियासाठी एकही सामना खेळला नाही. तसेच 1 महिन्यापासून देशांतर्गत क्रिकेटही खेळत नाही.
चहल मागच्या महिन्यात सैयद मुश्ताक अली स्पर्धेत दिसला होात. मात्र विजय हजारे ट्रॉफीत खेळत नाही.
टीम इंडिया या महिन्यापासून इंग्लंडविरुद्ध टी20 आणि वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेत चहलला संधी मिळणं कठीण आहे.