भारतातील 'हे' खतरनाक डाकू एन्काउंटरमध्ये मारले गेले

07 November 2023

Created By : Chetan Patil

भारतात एकेकाळी डाकूंची प्रचंड दहशत असायची. हे डाकू जीव घ्यायला मागे-पुढे बघायचे नाहीत.

डाकू जंगलात राहायचे. पण गाव-खेड्यांमध्ये जावून लुटमार करायचे. त्यांना जो विरोध करायचा त्यांना ते जीवे मारायचे.

पण काही डाकू लोकप्रिय होते. ते श्रीमंतांना लुटायचे आणि गरिबांना भरभरुन मदत करायचे. यापैकी डाकू मानसिंह होता. त्याच्या समाधीची आजही पुजा केली जाते.

या डाकूच्या हिंसेचं समर्थन करता येणार नाही. त्याने अनेक जणांचे खून केले. पण  तो गरिबांमध्ये प्रचंड प्रसिद्ध होता.

डाकू मानसिंहला त्याच्या कूकृत्यामुळे पोलिसांनी त्याचा 1995 मध्ये इन्काउंटर केला होता.

डाकू निर्भयसिंह गुर्जर हा देखील खतरनाक होता. तो प्रचंड क्रूर होता. त्याच्या टोळीत प्रत्येकाकडे AK-47 रायफल होती.

या डाकूच्या टोळीकडे त्या काळात बुलेटप्रुफ जॅकेट, दुर्बीन, नाईट व्हिजन आणि मोबाईल होता.

निर्भयसिंह गुर्जर या डाकूची नागरिकांमध्ये प्रचंड दहशत होती. लोक त्याला खूप घाबरायचे. अखेर 2005 मध्ये त्याच्या पापाचा घडा भरला. पोलिसांनी त्याचा एन्काउंटर केला होता.

डाकू विरप्पन हा देखील प्रचंड क्रूर होता. सर्वसामान्य नागरीकच नाही तर पोलीस कर्मचारीही त्याला दचकायची.

विरप्पन हा केरळ आणि तामिळनाडूच्या जंगलात चंदनाच्या लाकडांची आणि हत्तीच्या दातांची तस्करी करायचा. पोलिसांनी 2014 मध्ये त्याचा एन्काउंटर केला होता.