'आई तुळजाभवानी' मार्गशीर्ष विशेष एपिसोड; मालिकेत दोन सख्यांची होणार भेट
12 December 2024
Created By: Swati Vemul
'कलर्स मराठी'वरील 'आई तुळजाभवानी' ही मालिका प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय
मालिकेत नुकतचं खंडेरायाच्या म्हाळसाने आई तुळजाचं महाराष्ट्रात स्वागत केलेलं पाहायला मिळालं
म्हाळसाच्या सोबतीने तुळजाभवानी गावकऱ्यांवर आलेलं संकट दूर करताना दिसून आली
आता मालिकेत पुन्हा एकदा एक रंगतदार वळण आलं आहे
'आई तुळजाभवानी' आणि महालक्ष्मी या दोन सख्यांची भेट होणार आहे.
लक्ष्मी तुळजा भवानीला मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताची कहाणी सांगताना दिसणार आहे
असुराच्या अत्याचारामुळे सगळे हैराण झाले आहेत, त्यांना सुखाचे दिवस दाखवायला तुळजा महाराष्ट्रात आल्याचं ती लक्ष्मीला सांगते
तुळजा लक्ष्मीला तिच्या भक्तांना मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी भक्तिभावाने तिचं पूजन करायला सांगते
तसंच भविष्यात ते व्रत माझ्या आणि सगळ्याच आदिशक्तीच्या भक्तांना फलदायी ठरणार असल्याचं सांगते
'आई तुळजाभवानी' ही मालिका दररोज रात्री 9 वाजता कलर्स मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते
तैमुर-जेहसाठी करीनाने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागितली ही खास गोष्ट
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा