तोंडात सिगारेट आणि स्वॅग.. आमिरची लेक झाली ट्रोल

 16 January 2024

Created By: Manasi Mande

आमिर खानची लेक आयरा आणि नुपूर शिखरेचं नुकतंच लग्न झालं.

कोर्ट मॅरेजनंतर उदयपूरमध्ये थाटामाटात त्यांचा विवाह पार पडला.

त्यानंतर मुंबईत त्या दोघांचं ग्रँड रिसेप्शनही झालं.

आयराने वेडिंगचे आणि प्री-वेडिंगचे अनसीन फोटो शेअर केले.ज्यात ती मित्रांसोबत रिलॅक्स करत होती.

एका फोटोत ती मैत्रिणीसोबत मास्क लावून झोपली आहे.  

कुटुंबीय आणि मित्र-मैत्रीणींसोबत आयराने भरपूर धमाल करत लग्न एन्जॉय केलं.

यूजर्सनी आयराच्या या फोटोवर लाइक्सचा वर्षाव केला. पण एका फोटोमुळे आयरा ट्रोल होत आहे.

या फोटोत आयराच्या तोंडात सिगारेट दिसत्ये. केसांवर हायलाइट्सची ट्रीटमेंट आणि चेहऱ्यावर मेकअप सुरू आहे.

मेकअप करतानाच आयराने सिगारेट पकडून पोझ दिली. मात्र ते फोटो पाहून नेटकरी तिच्यावर भडकले.

स्मोकिंग प्रमोट करणं चुकीचं आहे असं नेटकऱ्यांनी म्हटलं. या सवयीमुळे आयु्ष्य बरबाद होऊ शकतं, अशी कमेंटही केली.

ना घोडा – ना वरात.. आमिरच्या जावयाने सांगितलं लग्नाला धावत येण्याचं खरं कारण