आराध्या बच्चनच्या शाळेची फी किती ?

20  December 2023

Created By : Manasi Mande

धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलचं वार्षिक गदरिंग नुकतंच झालं.

त्यामध्ये ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची लेक आराध्याने दिलेल्या परफॉर्मन्सची सर्वत्र चर्चा आणि कौतुक सुरू आहे.

आराध्याशिवाय शाहरुख खान , करीना कपूर, करण जोहर, करिश्मा कपूर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींची मुलं या शाळेत शिकतात.

2003 साली स्थापन झालेली ही शाळा बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स या पॉश भागात आहे.

पण या शाळेत ॲडमिशन घेणं काही खायचं काम नाही, कारण त्याची फी प्रचंड आहे.

ही शाळा CISCE आणि CAIE अफिलिएटेड असून त्यामध्ये ICSE व IGCSE ही दोन्ही बोर्ड्स आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या  शाळेतील वार्षिक फी लाखोंच्या घरात आहे.