20 वर्षांनी समजलं दुसऱ्याच्या पत्नीसोबत राहतोय.. अभिनेत्याच्या वक्तव्याने खळबळ !

30 August 2024

Created By : Manasi Mande

'आशिकी' चित्रपटामुळे दीपक तिजोरी हा खूप फेमस झाला. त्याची पर्सनल लाईफही तेवढीच चर्चेत होती. त्याने पत्नीशी घटस्फोट घेतल्याची बरीच चर्चा झाली.

दीपकचं शिवानीशी दुसरं लग्न होतं. अनेक चढ-उतारांनंतर दोघांनी 20 वर्षांनी घटस्फोट घेतला. पण सुनावणीदरम्यान जे सत्य समोर आलं त्याने दीपकला हादरलाच.

त्याची पत्नी शिवानीने पहिल्या पतीला घटस्फोट दिलाच नव्हता ही बाब 20 वर्षांनी दीपकच्या समोर आली.

20 वर्ष संसार करताना आपण दुसऱ्याच्या बायकोसोबत राहतोय, ती आपली कायदेशीर बायको नाहीये, याची त्याला जराही कुणकुण लागली नाही.

तेव्हा दीपकला आर्थिक तंगीचा सामना करावा लागला. त्याच्याकडे घर, काम काहीच नव्हतं. घटस्फोट आणि पोटगीचे पैसे देण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला.

शिवानीने त्याला घरातली फक्त एक खोली दिली. अन् त्याला जेवण काय पाणीही देण्यास तसेच कोणतीही मदत करण्यास नोकरांवर बंदी घातली होती.

 याचा दीपकवर मोठा मानसिक परिणाम झाला. या त्रासाला वैतागून तो कधी मित्राकडे तर कधी भाड्याच्या घरात राहू लागला.

माझं लग्न ही माझी सगळ्यात मोठी चूक होती, असंही दीपकने नमूद केलं.

मात्र दीपकच्या माजी पत्नीने हे सर्व आरोप फेटाळून लावत हे फक्त आपल्याला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे, असा दावा केला. त्याला माझ्या पहिल्या लग्नाबद्दल सगळं माहीत होतं, असंही त्या म्हणाल्या.