म्हणून ऐश्वर्याला घाबरतो अभिषेक ? मिसेसचा कॉल आला की...

म्हणून ऐश्वर्याला घाबरतो अभिषेक ? मिसेसचा कॉल आला की...

21 March 2025

Created By : Manasi Mande

जेव्हा आमिरने दिला रजनीकांत यांना नकार..
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनच्या जोडीचे लाखो चाहते आहेत. त्यांच्या नात्यांवर सतत मीडिया आणि लोकांची नजर असते.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनच्या जोडीचे लाखो चाहते आहेत. त्यांच्या नात्यांवर सतत मीडिया आणि लोकांची नजर असते.

पण आता अभिषेकने ऐश्वर्याबाबत असं वक्तव्य केलं आहे की त्यामुळे तो तिला चांगलंच घाबरतो, अशी चर्चा सुरू आहे. त्याचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

पण आता अभिषेकने ऐश्वर्याबाबत असं वक्तव्य केलं आहे की त्यामुळे तो तिला चांगलंच घाबरतो, अशी चर्चा सुरू आहे. त्याचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

नुकत्याच एका पुरस्कार सोहळ्यात अभिषेकला त्याच्या 'आय वाँट टू टॉक' साठी बेस्ट ॲक्टर ज्युरी हा पुरस्कार मिळाला.

नुकत्याच एका पुरस्कार सोहळ्यात अभिषेकला त्याच्या 'आय वाँट टू टॉक' साठी बेस्ट ॲक्टर ज्युरी हा पुरस्कार मिळाला.    

त्यावेळी या सोहळ्याचा होस्ट अर्जुन कपूरने त्याला मजेशीर प्रश्न विचारले. आय वाँट टू टॉक असं कोणत्या व्यक्तीने विचारलं की तू  स्ट्रेसमध्ये येतोस ? असं अर्जुनने विचारलं.

त्यावर अभिषेक म्हणाला..' तुझं लग्न नाही ना झालं अजून.. ते झालं की तुझ्याकडेही उत्तर असेल.' अभिषेकचं उत्तर ऐकून एकच हशा पिकला.

त्यानंतर अभिषेकने पत्नी ऐश्वर्याकडे इशारा करत म्हटलं 'जेव्हा मिसेसचा (पत्नी) कॉल येतो आणि ती म्हणते आय वाँट टू टॉक, तेव्हा समजावं की तुम्ही अडचणीत आहात' असं तो म्हणाला.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक दोघेही गेल्या 17 वर्षांपासून एकत्र आहेत.

2007 साली त्यांचं लग्न झालं आणि त्यांना आराध्या ही गोड लेकही आहे.