दगडूची व्हॅलेंटाईन डे ला विकेट ! क्षितीजा-प्रथमेशचा थाटात साखरपुडा
15 February 2024
Created By : Manasi Mande
'टाईमपास'पिक्चरमधील दगडूच्या भूमिकेने घराघरात पोहोचलेल्या प्रथमेश परबने चाहत्यांना गुड न्यूज दिली.
गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या लग्नाची चर्चा सुरू होती.
अखेर व्हॅलेंटाईन डे च्या मुहूर्तावर प्रथमेशने क्षितीजा घोसाळकरशी साखरपुडा केला.
थाटात पार पडलेल्या या सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
'आमचा व्हॅलेंटाईन डे …आता आयुष्यभराची साथ' अशी कॅप्शन देत प्रथमेशने त्याच्या आयुष्यातील खास दिवसाचे फोटो शेअर केले.
प्रथमेश-क्षितीजाची इन्स्टाग्रामवरून ओळख झाली. हळूहळू मैत्री आणि नंतर त्याचं प्रेमात रुपांतर झालं.
14 फेब्रुवारी 2023 ला प्रथमेश-क्षितीजाने सोशल मीडियावर नात्याची कबुली दिली होती.
साखरपुड्याच्या फोटोंनंतर चित्रपटसृष्टीतील अनेकांनी या जोडप्याला शुभेच्छा दिल्या.
पांढऱ्या शेरवानीत प्रथमेश तर जांभळ्या रंगाच्या पैठणीत क्षितीजा सुंदर दिसत होती.
Salman Khan | पोट आत घ्यायला वेळ मिळाला नाही वाटतं… सलमानचं वजन पाहून चाहते हैराण
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा