ऐश्वर्याने बच्चन आडनाव हटवलं, घटस्फोटाची चर्चा सुरू असतानाच मोठी घडामोड

28 November 2024

Created By : Manasi Mande

अभिनेत्री ऐश्वर्या राय तिच्या सौंदर्याप्रमाणेच खणखणीत अभिनयासाठीही नावाजली जाते. 'और प्यार हो गया..' मधून तिने हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलं.

करिअरच्या पीकवर असताना 2007 साली ऐश्वर्याने अभिषेक बच्चनशी लग्न केलं. 2011 साली आराध्याचा जन्म झाला.

मात्र गेल्या काही महिन्यांपासून ऐश्वर्या-अभिषेकच्या नात्यात सर्व काही ठीक नसल्याच्या, त्यांच्या बेबनावाच्या बातम्या समोर येत आहेत.

मात्र ऐश्वर्याचे सासरे, अमिताभ बच्चन यांनी या सर्व बातम्या फेटाळून लावत त्यात तथ्य नसल्याचे  ब्लॉगमध्ये नमूद केलं. पण तरीही ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चा कमी होत नाहीयेत.

नुकतीच ऐश्वर्या दुबईमध्ये एका इव्हेंटसाठी गेली होती. ब्ल्यू आणि सिल्व्हर गाऊनमध्ये ती अप्रतिम दिसत होती.

पण तिच्यामागे स्क्रीनवर नजर पडताच चाहते हैराण झाले. तिच्या नावासमोर 'बच्चन' हे आडनाव नव्हतंच.

ते पाहून चाहत्यांना धक्का बसला. घटस्फोटाच्या बातम्या खऱ्या आहेत का? असा प्रश्न अनेकांना पडला.

हे चुकून झालं की जाणून-बुजून करण्यात आलं असा सवाल काही चाहत्यांनी विचारला. ऐश्वर्या पहिल्यांदा तिच्या आडनावाशिवाय दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात.

सोशल मीडियावर सध्या ग्लोबल वुमन फोरम 2024 चे व्हिडीओ व्हायरल झालेत. त्यामध्ये उपस्थित असलेल्या ऐश्वर्या रायने उपस्थितांना संबोधितही केलं.