Aishwarya Rai : अभिषेकशी घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान ऐश्वर्या बिग बींबद्दल काय बोलली ?

Aishwarya Rai : अभिषेकशी घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान ऐश्वर्या बिग बींबद्दल काय बोलली ?

 12  October 2024

Created By : Manasi Mande

जेव्हा आमिरने दिला रजनीकांत यांना नकार..
बऱ्याच काळापासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनच्या घटस्फोटाबद्दल अफवा उडत आहेत. मात्र त्या दोघांपैकी कोणीच या विषयावर मौन सोडलं नाही.

बऱ्याच काळापासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनच्या घटस्फोटाबद्दल अफवा उडत आहेत. मात्र त्या दोघांपैकी कोणीच या विषयावर मौन सोडलं नाही.

मात्र याचदरम्यान ऐश्वर्याने तिचे सासरे अमिताभ बच्चन यांच्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट लिहीली आहे.

मात्र याचदरम्यान ऐश्वर्याने तिचे सासरे अमिताभ बच्चन यांच्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट लिहीली आहे.

11 ऑक्टोबर रोजी अमिताभ यांचा वाढदिवस होता, ते 82 वर्षांचे झाले. यानिमित्ताने चाहते, अनेक सेलिब्रिटींनी बिग बीं ना शुभेच्छा दिल्या.

11 ऑक्टोबर रोजी अमिताभ यांचा वाढदिवस होता, ते 82 वर्षांचे झाले. यानिमित्ताने चाहते, अनेक सेलिब्रिटींनी बिग बीं ना शुभेच्छा दिल्या.

ऐश्वर्या राय हिनेही तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट लिहीत अमिताभ यांना शुभेच्छा दिल्या.तिने आराध्या आणि बिग बी यांचा फोटो पोस्ट केला.

हा फोटो बराच जुना आहे, कारण त्यात आराध्या अगदी लहान दिसत आहे. आजोबा आणि नात यांच्या चेहऱ्यावर हास्य विलसत आहे.

'हॅपी बर्थडे पा-दादाजी, गॉड ब्लेस यू. ' असे ऐश्वर्याने लिहीले असून त्यावर लाईक्सचा पाऊस पडला आहे.

या पोस्टमध्ये ऐश्वर्याने पा आणि दादाजी ( बाबा आणि आजोबा) असे दोन्ही शब्द लिहीले आहे. तिने तिच्याकडून आणि आराध्यातर्फेही त्यांना शुभेच्छा दिल्यात.