Prajakta Mali : प्राजक्ता माळीने केली वचनपूर्ती, फोटो शेअर करत म्हणाली....

24 December 2024

Created By : Manasi Mande

मालिका, चित्रपट, हास्यजत्रा,प्राजक्तराज हा ब्रँड असो किंवा अजून काही... अभिनेत्री प्राजक्ता माळी सतत कार्यरत असते. (photos : Instagram)

तिची प्रमुख भूमिका असलेला 'फुलवंती' चित्रपट खूप गाजला, तिच्या भूमिकेचेही बरंच कौतुक झालं.

सतत कामात व्यस्त असलेल्या प्राजक्ताने थोडा ब्रेक घेतला आणि देवदर्शनाला निघाली.

गुजरातला पोहोचून प्राजक्ताने श्री सोमनाथ आणि नागेश्वर यांचं दर्शन घेतलं, नंतर ती द्वारकेलाही गेली.

या देवदर्शनाचे फोटोही तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलेत.

गेल्या वर्षी प्राजक्ताने 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्याचा संकल्प केला होता. तीच वचनपूर्ती करताना ती दिसत आहे.

तिच्या फोटोंवर नेहमीप्रमाणेच चाहत्यांनी लाईक्स, कमेंट्सचा वर्षाव करत तिचं कौतुक केलंय.