'देवयानी' फेम शिवानी सुर्वेचं जुळलं हो ! ( Photo : Instagram)

1 February 2024

Created By : Manasi Mande

अभिनेत्री शिवानी सुर्वे बरीच लोकप्रिय आहे. देवयानी मालिकेतून लोकप्रिय झालेली शिवानी नुकतीच  झिम्मा 2 मध्ये झळकली.

शिवानीच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज आहे. शिवानीने अभिनेता अजिंक्य ननावरेसोबत साखरपुडा केला आहे.

शिवानीचा मोठा चाहतावर्ग आहे. अजिंक्य ननावरे हा सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत सध्या काम करतोय.

शिवानी आणि अजिंक्य यंदा लग्नबंधनात अडकणार अशी चर्चा होती, अखेर ती खरी ठरली. नुकतीच दोघांची एंगेजमेंट झाली.

शिवानी -अजिंक्यने त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर केले शेअर.

दोघांचही चाहत्यांनी केलं अभिनंदन, अनेक सेलिब्रिटींनीही दिल्या शुभेच्छा.