आराध्या शाळेत जात नाही का ? चाहत्यांना चिंता
01 August 2024
Created By : Manasi Mande
ऐश्वर्या रायचे काही फोटो नुकतेच व्हायरल झाले, त्यामध्ये ती चाहत्यांसोबत सेल्फी काढत होती.
आराध्यासह ती न्यूयॉर्कमध्ये सुट्टीवर गेली होती. परत आल्यावर एअरपोर्टवरील त्यांचे फोटोही समोर आले.
ब्लॅक ड्रेसमध्ये ऐश्वर्या नेहमीप्रमाणे सुंदर दिसत होती. जांभळा स्वेटशर्ट, ब्लॅक पँटमध्ये आराध्याही छान दिसत होती.
एअरपोर्टवरून निघताच पापाराझींनी त्यांना कॅमेऱ्यात कैद केलं. त्यांचा व्हिडीओही व्हायरल झाला.
मायलेकीचा फोटो पाहून चाहते खुश झाले, पण अनेकांना अभिषेकची कमतरता जाणवली.
अनेक महिन्यांपासून अभिषेक-ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या बातम्या फिरत आहेत. त्याचं ऐश्वर्या-आराध्यासोबत अभिषेक न दिसल्याने चर्चांना उधाण आलं.
कमेंट्समध्ये अनेकांनी अभिषेकबद्दल प्रश्न विचारले. तर काहींना आराध्याच्या शाळेची चिंता सतावत होती.
ही शाळेत कधी जाते?, बहुतांश काळ तर फिरत असते, असा प्रश्नही अनेकांनी विचारला.
ऐश्वर्या प्रत्येक ठिकाणी आराध्याला घेऊन जाते. ही शाळेत जात नाही का, शिकत नाही का ? असे एका युजरने विचारलं.
अंबानींच्या लग्नात दागिन्यांपेक्षा सेलिब्रिटींच्या हातातील बँड्सची चर्चा; काय होतं कारण?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा