आराध्या, जा... ऐश्वर्या आणि आराध्याचे बाप्पाच्या दर्शनावेळी हाल; काय घडलं?

10 September 2024

Created By : Manasi Mande

बॉलिवूडचे सेलिब्रिटीज गणपती बाप्पाचं दर्शन घेताना दिसत आहेत

ऐश्वर्या राय, आराध्या आणि आई वृंदा राय यांनीही बाप्पाचं दर्शन घेतलं

ऐश्वर्याचा बाप्पाचं दर्शन घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झालाय

त्यात ऐश्वर्या आई आणि मुलीला सांभाळताना दिसतेय

आराध्या कार आलीय, जा... असं ऐश्वर्या आराध्याला बोलताना दिसतेय

आईची हाक ऐकताच आराध्याही पटकन जाऊन कारमध्ये बसते

प्रचंड गर्दीमुळे आराध्याचे प्रचंड हाल झाल्याचं दिसतंय

आराध्याला दरदरून घाम फुटला होता, केसही विस्कटले होते

ऐश्वर्याही मुलीचा हा अवतार पाहून त्रस्त झाल्याचं दिसतंय