अंबानींच्या लग्नात अक्षयच्या हातात  ट्विंकल खन्नाची पर्स , चाहतेही इंप्रेस

16 July 2024

Created By : Manasi Mande

अनंत-राधिकाच्या लग्नात अनेक सेलिब्रिटी हजर होते. पण तरीही अनेकांची नजर फक्त खिलाडी स्टार अक्षय कुमारला शोधत होती.

लग्नात तो आला नाही, पण नंतर त्याने पत्नी ट्विंकल खन्नासह रिसेप्शनला हजेरी लावत अनंत-राधिकाला शुभेच्छा दिल्या.

त्यांचा व्हिडीओ  व्हायरल होत असून तो पाहून चाहते खूप खुश आहेत.

अनंत-राधिकाच्या लग्नाला आलेल्या अक्षय कुमारने त्याच्या हातात पत्नी ट्विंकलची पर्स पकडली होती.

पाहुण्यांसमोरही बायकोची पर्स हातात पकडणाऱ्या अक्षयला पाहून चाहते इंप्रेस झाले आणि त्याचं कौतुक केलं.

या कृतीने अक्षयने सगळ्यांचं मन जिंकलंय, असं एका युजरने लिहीलं.

अक्षयने जेवढ्या प्रेमाने पत्नीची पर्स पकडली, ते पाहून खूप बरं वाटलं, असंही एका युजरने म्हटलं.

कोविड झाल्यामुळे अक्षय लग्नाला येऊ शकला नव्हता, पण बरा झाल्यावर त्याने रिसेप्शनला हजेरी लावली.

अखेर अक्षयला अंबानींच्या फंक्शनमध्ये पाहून चाहत्यांना खूपच आनंद झाला.