घटस्फोटाची चर्चा सुरू असतानाच ऐश्वर्या- अभिषेकमधील ती गोष्ट समोर; मैत्रिणीचा खुलासा
7 December 2024
Created By: Mayuri Sarj
erao
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय ही जोडी चाहत्यांची आवडती जोडी आहे. पण सध्या घटस्फोटामुळे ही जोडी चर्चेत.
मात्र हे कपल नुकतेच एका पार्टीत एकत्र दिसले. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
दरम्यान, अभिनेत्री तनाज इराणी या जोडप्याबद्दल काही खास बोलली आहे.
तनाजने 'कुछ ना कहो' या चित्रपटात अभिषेक -ऐश्वर्यासोबत काम केले होते. तिने हे दोघेही एकमेकांपेक्षा पूर्णपणे भिन्न असल्याचं एका मुलाखतीत सांगितलं.
तनाजने सांगितले, अभिषेकची स्टाइल मजेदार आहे. चित्रपटाच्या सेटवर तो खोड्या करतो. तर ऐश्वर्या तिचे काम गांभीर्याने घेते.
ऐश्वर्याच्या सौंदर्याचे कौतुक करताना तनाज म्हणाली की ती एखाद्या बाहुलीपेक्षा कमी नाहीये.
तसेच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिषेकने केलेल्या प्रँकचा किस्साही तिने सांगितला.
ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यात घटस्फोटाच्या चर्चा असताना दोघेही एका पार्टीत एकत्र दिसल्याने चर्चांना पूर्णविराम लागणार असं चित्र आहे.
हिवाळ्यात खजूर खाण्याची योग्य पद्धत.
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा