बॉलिवूडचे शहनेशहा अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदाचे बरेच चाहते आहे. 26 वर्षांची नव्या NGO चालवते.
त्याशिवाय ती पॉडकास्ट शो 'व्हॉट द हेल नव्या'ची होस्टही आहे.
त्यामध्ये तिची आई श्वेता आणि आजी जया बच्चनदेखील दिसतात.
बऱ्याच वेळा नव्याच्या बॉलिवूड एंट्री बद्दल चर्चा होते. आता तिची आई श्वेता बच्चन हिने याबद्दलचे मौन सोडले आहे.
नव्याच्या बॉलिवूड एंट्रीबद्दल विचारले असता, तिला फिल्मी दुनियेत काहीच रस नसल्याचे श्वेता बच्चन हिने सांगितलं.
तुम्हाला सगळ्यांना माहित्ये, नव्या कसं काम करते. ती खूप व्यस्त आहे. बॉलिवूड तिच्यासाठी आहे असं मला वाटत नाही.
नव्या बॉलिवूडपासून दूर असली तरी तिचा भाऊ अगस्त्यने फिल्मी दुनियेत एंट्री केली. गेल्या वर्षी झोया अख्तरच्या 'द आर्चीज'मध्ये त्याने सुहाना खानसोबत काम केलं.
नव्या तिच्या एनजीओ आणि पॉडकास्टमध्ये बिझी आहे. शिवाय ती वडील, निखिल नंदा यांच्यासोबतही काम करते. सोशल मीडियावर तिचे अनेक चाहते आहेत.