योग गुरूही थिरकले... अनंत अंबानीच्या लग्नात रामदेवबाबांचा डान्स

13 July 2024

Created By :  Manasi Mande

अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या शाही विवाहीच सध्या सर्वत्र चर्चा. 12 जुलै रोजी शानदार विवाह झाला.

या शाही लग्नासाठी देश-परदेशातील विविध मान्यवर आले होते.

अंबानी कुटुंबाच्या जल्लोषात योग गुरू बाबा रामदेवही सहभागी झाले. अनंतच्या वरातीत त्यांनी ठेका धरला.

सोशल मीडियावर लग्नातील व्हिडीओ शेअर झालाय. तेथे अनंत अंबानी आणि बाबा रामदेव तूफान डान्स करताना दिसले.

अनंत अंबानीने बाबा रामदेव यांचा हात पकडून शानदार नृत्य केलं.

डान्स करताना दोघेही खूप खुश होते. एकंदरच त्यांनी ही वरात फुल एन्जॉय केल्याचे दिसून येत होते.

अनंत आणि बाबा रामदेव यांचं हे बाँडिंग आणि तूफान डान्स नेटकऱ्यांनाही खूप आवडलाय.