अंबानींच्या लग्नात दागिन्यांपेक्षा सेलिब्रिटींच्या हातातील बँड्सची चर्चा

15 July 2024

Created By :  Manasi Mande

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. (सर्व फोटो सौजन्य - PTI)

या लग्नासाठी विविध सेलिब्रिटी आले होते. त्या सर्वांच्या हातात विविध रंगाचे बँड्स बांधले होते, ते तुम्ही नोटीस केलंत का ?

या ग्रँड वेडिंगमध्ये विविध झोन होते, तिथे प्रत्येक गेस्टनुसार एंट्री होती. सर्वांची वेगवेगळ्या झोनमध्ये बसण्याची व्यवस्था करण्यात आली.

उदा :  हातात लाल रंगाचा बँड असलेल्या व्यक्तीला त्याच गेटमधून एंट्री आणि त्या झोनमध्ये जाण्याची परवानगी होती. प्रत्येक रंगानुसार झोन होता.

सर्वांना निमंत्रण पत्रिकेसह क्यूआर कार्डही दिले.  त्याद्वारे त्यांची एंट्री झाली आणि झोन नुसार हाताला बँड बांधण्यात आले.

कर्मचारी, सेक्युरिटी आणि सर्व्हिस स्टाफ, परदेशी पाहुणे, धर्मगुरू सर्वांना वेगवेगळ्या झोनमधून एंट्री देण्यात आली.

अनंत -राधिकाच्या लग्नात फिल्म सेलिब्रिटी, बिझनेस, क्रीडा, राजकारण आणि विविध क्षेत्रातील मान्यवर आले होते.

त्यामध्ये अनेक विदेशी पाहुण्यांचाही समावेश होता. या मेगा इव्हेंटमध्ये वेगवेगळ्या दिवशी पाहुणे कार्यक्रमात सहभागी झाले.