अंकिता लोखंडे हॉस्पिटलमध्ये दाखल, तिथेही ट्रोल..

03 May 2024

Created By :  Manasi Mande

अंकिता लोखंडे-विकी जैनेचे लेटेस्ट फोटो पाहून चाहते हैराण. या फोटोंमध्ये दोघेही हॉस्पिटलमध्ये दिसत आहेत.

अंकिता लोखंडेच्या हाताला प्लास्टर घातलंय तर विकी जैनही बेडवर झोपला होता. त्याला काय झालंय ते अजून समजलेलं नाही.

ठणठणीत असो वा आजारी... नेहमीच एकत्र !अशी कॅप्शन लिहीत अंकिताने फोटो शेअर केलेत. त्यावर अनेक कमेंट्स आल्या.

निशा रावल, युविका चौधरी, महेश शेट्टीसह अनेकांनी अंकिताच्या पोस्टवर कमेंट करत लवकर बरे व्हा अशा शुभेच्छा दिल्या.

त्यांचे फोटो पाहून चाहतेही इमोशनल झाले. मंकू आणि विक्कू, लवकर बरे व्हा, असे एका युजरने लिहीले.

 हॉस्पिटलमध्ये शो ऑफ नको, आराम करा असा सल्ला काहींनी अंकिताला दिला. अशा फोटोंनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असल्याची टीकाही काहींनी केली.

अंकिता आणि विकी जैन दोघेही 'बिग बॉस 17' मध्ये एकत्र दिसले होते.