केएल राहुल-अथिया शेट्टीने विकत घेतलं कोट्यवधींचं घर

18 July 2024

Created By : Manasi Mande

भारतीय क्रिकेटर आणि अभिनेत्री अथिया शेट्टी यांची जोडी खूप प्रसिद्ध आहे. दोघांनी नुकतीच एक गुड न्यूज दिली. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

अभिनेता सुनील शेट्टीची लेक आणि जावयाने मुंबईतील पाली हिल भागात एक आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे.

अथिया- केएल राहुलचे हे अपार्टमेंट 3,350 स्क्वेअर फीटचे असून त्याची किंमत सुमारे 20 कोटी असल्याचं सांगितलं जातंय.

रिपोर्टनुसार, या बिल्डींगला BMC कडून पार्शिअल ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळालंय.

या फ्लॅटसाठी 1.20 कोटींची स्टँप ड्युटी आणि 30 हजार रुपयांची रजिस्ट्रेशन फी भरण्यात आली.  15 जुलै रोजी प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन झालं.

पाली हिल हा मुंबईतील पॉश भाग असून इथे बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी राहतात.

सलमान खान, तृप्ती डिमरी, जान्हवी कपूर यासारख्या अनेक सेलिब्रिटींची इथे घरं आहेत. मात्र अथिया-केएल राहुलने घराची अधिकृच घोषणा केलेली नाही.