भूषण प्रधानची स्वप्नपूर्ती; आई-वडिलांसाठी घेतलं सुंदर घर

6 September 2024

Created By: Swati Vemul

अभिनेता भूषण प्रधानने आईवडिलांसाठी घेतलं घर

सोशल मीडियावर पोस्ट केले गृहप्रवेशाचे फोटो

गेल्या सहा महिन्यांत भूषणच्या चित्रपटांना मिळालं चांगलं यश

'जुनं फर्निचर', 'घरत गणपती' हे दोन्ही चित्रपट गाजले

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर स्वप्न सत्यात उतरल्याची भावना भूषणकडून व्यक्त

त्यांनी इतकी वर्षे माझ्यासाठी केलेल्या त्याग, प्रेम आणि आदराचं प्रतिनिधीत्व हे घर करतं- भूषण

आयुष्य आणि कला यांचं एक वर्तुळ पूर्ण झालं, असं भूषणने लिहिलंय

'जुनं फर्निचर' आणि 'घरत गणपती' या दोन्ही कौटुंबिक चित्रपटात भूषणने साकारल्या भूमिका

या यशामागे गणपती बाप्पाचा आशीर्वाद असल्याचं भूषणने म्हटलंय

'नवरी मिळे हिटलरला'मधील एजे खऱ्या आयुष्यात घटस्फोटीत; 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री आहे पूर्व पत्नी